या ‘अद्भुतिका’ नाहीत; प्रेमकथा किंवा प्रेमविरोधी कथाही नाहीत, तर पाटकरांना वेळोवेळी सुचलेल्या ‘दृश्यगोष्टी’ आहेत!
लघुकथा लिहिण्याचे ओ-हेन्रीएटिक धक्कातंत्र किंवा मराठी लेखकांना प्रिय असा आरंभ-शेवटाचा चमत्कृतिपूर्ण प्रयोग करण्याचा या कथांना सोस नाही. आरंभबिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंत नेणाऱ्या पारंपरिक कथा पाटकरांनी लिहिलेल्या नाहीत. पाटकरी ढंगांनी आणि कल्पना-भराऱ्यांनी त्या सजल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे विशिष्ट नजरेतून पाहणेच इष्ट.......